*कोकण Express*
*आम. दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमाला मदत*
*सावंतवाडी ः प्रतिनीधी*
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ-अणाव येथील आनंदाश्रमाला आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी मदतीचा धनादेश आश्रमाच्या व्यवस्थापकांडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी, प्रकाश बिद्रे, गजानन नाटेकर,बबन राणे, विश्वास घाग, शैलेश मेस्त्री,एकनाथ हळदणकर आदी उपस्थित होते.

