*कोकण Express*
*महाड आगारव्यवस्थापक व वाहतूक नियंत्रकांचा मनमानी कारभार*
*मंडणगड:*
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील अनेक बसेस आंबेत मार्ग बंद असल्याने मुंबई,पुणे चालवण्यात येणाऱ्या बसेस महाड मार्गे चालवण्यात येतात मात्र आगार व्यवस्थापक महाड व वाहतूक नियंत्रक महाड यांनी दुसऱ्या आगाराच्या बसेस प्रवासी प्रवेश करण्यासाठी जातात पण त्याच वेळेस आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक महाड यांच्या संगनमतानी दुसऱ्या आगाराची प्रवासी भरण्यासाठी थांबुन देत नाही व चालक व वाहक यांना धमकावत गाडी बाहेर काढण्यास भाग पाडतात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची रत्नागिरी विभागातील बस व महाड आगार एकाच महामंडळाची आहे हे सर्व प्रकार प्रवासी
वर्गाच्या समोर होत असल्याने एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन होत आहे विभाग नियंत्रक रायगड व विभागीय वाहतूक नियंत्रकानी याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा वरिष्ठांकडे तक्रार दाखल करावी लागेल

