*कोकण Express*
*बिडवाडी हायस्कूलमध्ये वृक्षदिंडी व वृक्षारोपण*
*कणकवली ः प्रतिनीधी*
माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी प्रशाळेमध्ये वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षदिंडी वेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या घोषणा देवून जनजागृती केली. नंतर प्रशालेच्या परिसरांमध्ये विविध रोपांची योग्य पद्धतीने लागवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमप्रसंगी बिडवाडी गावचे कृषितज्ञ व सेंद्रिय शेती करणारे कल्पक चिंदरकर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे. सेंद्रिय शेती कशी फायदयाची आहे याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. काही निवडक व्हीडीओ विदयार्थ्यांना दाखवून सेंद्रिय शेती करण्यासाठी आवश्यक ती मदन करू असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशाळेचे प्राचार्य एम.डी जोशी यांनी केले . सदर कार्यक्रमाचे आभार एस. के .कांबळे यांनी मानले.यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. प्राध्यापकवर्ग, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.