*कोकण Express*
*सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या फोंडाघाट गावात पावसाची रिमझिम*
अचानक आलेल्या पावसाने उडाली धांदल
*फोंडाघाट ः प्रतिनिधी संजना हळदिवे*
परतीचा पाऊस जावून तब्बल दीड महिना उलटला असतानाही आज दुपारी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट गावात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कणकवली शहराच्या काही भागासह पावसाची रीप रीप पहायला मिळाली. अचानक दाखल झालेल्या पावसामुळे साऱ्यांचीच धांदल उडाली. फोंडाघाट गावात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते तर दुपारी २ पासून ढगांची दाटी झाली तीन वाजल्यानंतर रिमझिम सरींना सुरुवात झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत पावसाचा शिडकावा सुरु होता. अचानक आलेल्या पावसाने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला. अचानक आलेल्या पावसामुळे गावकऱ्यांची धांदल उडाली.