*कोकण Express*
*जि. प. शाळा कणकवली क्र. 3 येथे रानभाज्या पाककला स्पर्धा उत्साहात*
*कणकवली ः प्रतिनीधी*
कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जि. प. शाळा कणकवली क्र. 3 येथे रानभाज्या पाककला स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी केले.शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा करंबेळकर यांनी उपस्थित त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तर शाळेतील पदवीधर शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे औषधी गुणधर्म समजावून देत आहारामध्ये रानभाज्यांचा जरूर समावेश करा असे सांगितले.
यावेळी रानभाज्यांचे प्रदर्शनही मांडण्यात आले .पाककला स्पर्धेत चौथी ते सातवीच्या एकूण 55 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण पूनम लालासाहेब घोरपडे व श्रेया देवेंद्र राणे यांनी केले. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रतिभा कोतवाल यांनी प्रोत्साहन म्हणून वह्या वाटप केले. स्पर्धेदरम्यान सर्व शिक्षा अभियान सिंधुदुर्गच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे त्याचप्रमाणे सर्व शिक्षा अभियानच्या मृणाल आरोस्कर , मानसी देसाई तसेच डायट सिंधुदुर्गच्या अधिव्याख्याता वैशाली नाईक व कणकवली सर्व शिक्षा अभियानच्या माने यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व शाळेने हा समाज उपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- इयत्ता चौथी पाचवी गट- प्रथम क्रमांक -सानिका बाईत ,द्वितीय भार्गवी जाधव, तृतीय भार्गवी मालंडकर, उत्तेजनार्थ गाथा कांबळे.
इयत्ता सहावी सातवी गट -प्रथम क्रमांक श्री ठाकूर, द्वितीय वरद बाक्रे, तृतीय प्रांजल ठाकूर ,उत्तेजनार्थ विघ्नेश तेली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अक्षया राणे,नितीन जठार ,लक्ष्मण पावसकर ,अश्विनी परुळेकर रूपाली डोईफोडे या शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.