देवगड जामसंडे युवा सेना शहर प्रमुखपदी तेजस मामघाडी

देवगड जामसंडे युवा सेना शहर प्रमुखपदी तेजस मामघाडी

*कोकण Express*

*देवगड जामसंडे युवा सेना शहर प्रमुखपदी तेजस मामघाडी !*

*शहर समन्वयकपदी सौरभ माने यांची नियुक्ती*

*देवगड-प्रतिनिधी*

तालुक्यातील युवा सेनाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येऊन देवगड- जामसंडे युवा सेना शहरप्रमुखपदी नगरसेवक तेजस मामघाडी, शहरप्रमुख पदावरून शहर समन्वयकपदी सौरभ माने, मिठबाव विभागप्रमुख पदी दत्तप्रसाद उर्फ तुषार धुरी याना उपविभागप्रमुख पदावरून बढती देण्यात आली असून शिरगाव विभागप्रमुख पदी सागर गोरुले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती युवा सेना तालुका प्रमुख निनाद देशपांडे यांनी दिली.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,यांनी नियुक्तीचे पत्र पदाधिकारी याना सादर करण्यात आले आहे.या वेळीशिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, युवासेना तालुकाप्रमुख निनाद देशपांडे, युवासेना विभागप्रमुख गणेश वाळके, फरीद काझी, युवासेनेचे गणेश गावकर, सिद्धेश माणगावकर, युवासेना शाखाप्रमुख हितेश खवळे, मुकेश मयेकर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!