*कोकण Express*
*केंद्रशाळा भिरवंडे नं. १ शाळेतील स्वच्छतागृहांनी घेतला मोकळा श्वास*
*माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्याकडून तत्परता*
*कणकवली ः प्रतिनीधी*
जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष आणि भिरवंडे गावचे सुपुत्र संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या माध्यमातून केंद्रशाळा भिरवंडे नं. १ येथील समस्येच्या गर्तेत सापडलेल्या शौचालय व स्वच्छतागृह यांच्या आजूबाजूला वाढलेल्या झुडपांची तोड करून तसेच नादुरुस्त-गळके छप्पर पत्रे घालून दुरुस्त केल्यामुळे या शौचालय-स्वच्छतागृह इमारतींनी मोकळा श्वास घेतला आहे.
गुरुपौर्णिमेदिवशी शाळेला सदिच्छा भेट दिल्यानंतर शाळेतील स्वच्छतागृह व शौचालयाची बिकट अवस्था संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या निदर्शनास आली होती. तशाच धोकादायक स्थितीत शाळेत शिक्षण घेणारी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील मुले या सुविधांचा वापर करत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासकीय निधीची वाट न पाहता संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी भिरवंडे ग्रामस्थांच्या मदतीने तत्काळ दुरुस्तीस सुरुवात केली. त्यामुळे पालक, विद्यार्थी , कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दुरुस्तीदरम्यान छप्पर खाचांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास दिसून आला. त्यामुळे या तत्काळ दुरुस्तीमुळे मोठा अनर्थ टळला असल्याची भावना पालक व ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दरम्यान, संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केलेल्या या लोकोपयोगी कामाबद्दल भिरवंडे गावातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.