*कोकण Express*
*नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या अर्चना वेंगुर्लेकर यांना मदतीची गरज*
*मुसळधार पावसात घर कोसळून तीन लाखाचे नुकसान;निवाराच हरपल्याने अर्चना यांना दानशूर व्यक्तीच्या दातृत्वाची आवश्यकता*
*वेंगुर्ले ः प्रतिनीधी*
वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावातील तळीवाडी येथिल महिला श्रीमती अर्चना अरूण वेंगुर्लेकर यांचे पती कै.अरुण वेंगुर्लेकर हे गतवर्षी आकस्मिक रित्या मृत्युमुखी पावले.कै.अरूण वेंगुर्लेकर यांची परीस्थिती अतिशय गरीबीची होती.लोकांच्या बागांमध्ये तसेच इतर ठिकाणी मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत.
पदरात असलेल्या तिन मुलींपैकी एका मुलीचे लग्न करून दिल्यानंतर कै.अरूण वेंगुर्लेकर हे आपल्या पत्नी व दोन मुलीसह तळीवाडी येथिल आपल्या घरात राहत असत.तसेच कै.अरुण यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुली यांच्यावर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभारले असताना काही महिन्यांपूर्वी कै अरुण वेंगुर्लेकर यांच्याही आईचे निधन झाले आणि सदर वेंगुर्लेकर कुटुंबिय दुःखाच्या खाईत लोटले गेले.
प्रथम आधारस्तंभ असलेल्या नवऱ्यावर म्हणजेच कै. अरुण यांच्या निधनानंतर श्रीम अर्चना अरूण वेंगुर्लेकर यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असतानाच ८ जुलै रोजी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या अतिवृष्टीमुळे त्यांचे घर कोसळले आहे.सुदैवाने श्रीम अर्चना वेंगुर्लेकर या त्या दिवशी आपल्या मुलीकडे असल्याने मोठा अनर्थ टळला.या अतिवृष्टीमुळे त्यांच्या घराचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून आता त्यांच्या निवा~याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून तीच्यावर मोठे संकट ओढावले आहे.
यावेळी केळुस गावचे उपसरपंच तथा कोकणचा तडाखा न्यूजचे संपादक आबा खवणेकर यांनीही संबधित कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या निवारासाठी तात्पुरती सोय म्हणून ताडपत्री दिली असून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.तर पत्रकार आबा खवणेकर यांनी अर्चना वेंगुर्लेकर यांना घेऊन वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली.यावेळी श्री. लोकरे साहेब यांनी शासकीय स्तरावरील जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचेही आपले प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.तसेच अशा या बेघर झालेल्या महिलेस मदतीचा हात देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जपा माणुसकीचे नाते भरा गरीबाचे खाते हेच खरे माणूसकीचे नाते
माणुसकीच्या नात्याने सढळ हस्ते मदतीसाठी खालील खात्यात रक्कम भरून संबधित महिलेला आर्थिक हातभार लावावा.
नाव – श्रीमती अर्चना अरुण वेंगुर्लेकर
बँक – भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा – केळूस
IFSC :- SBIN0007490
खाते क्रमांक:-11518688179