*कोकण Express*
*सराईत चोरट्याला गोव्यातून अटक…!*
*कणकवली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी…!*
*कणकवली ः प्रतिनीधी*
येथील बाजारपेठ येथून फिर्यादी भिकाजी धोंडु अस्वेकर , (वय ७ ९ वर्षे , रा . आशिये)यांचा १ फेब्रुवारी २०२२ ला मोबाईल चोरीला गेला होता.या प्रकरणी सराईत आरोपी बिक्रम महेंद्र ठाकुरी (वय २६ वर्षे , रा . मडगाव ,गोवा,मूळ मैतीदेवी, काठमांडु नेपाळ) याला कणकवली पोलीसांच्या पथकाने अटक केली आहे.त्याने अनेक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे.कणकवली पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,कणकवली बाजारपेठ येथील हॉटेल डायमंड समोर श्री.अस्वेकर यांचा मोबाईल १ फेब्रुवारी २०२२ चोरीला गेला होता. आकाशी रंगाचा Vivo कंपनीचा V२० मॉडेलचा मोबाईल ९ हजार किंमतीचा होता.आरोपी हा नेपाळी असून सराईत चोरटा आहे,त्याला दारुचे व्यसन आहे.त्यासाठी दररोज मोबाईल चोरी करायचा.त्याने हा मोबाईल दारुचे पैसे नसल्याने मडगाव येथील एका बार मालकाला दिला आणि एटीएम मधून पैसे आणतो,असे राहून गेल्या दोन महिन्यापूर्वी दिला होता. अखेर, सिंधुदुर्ग पोलिसांच्या सायबर सेल चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुतार यांच्या सतर्गतेमुळे चोरीतील मोबाईलचे लोकेशन कणकवली पोलिसांना आले होते.त्यानुसार कणकवली पोलिसांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी त्या बार मालकाला ताब्यात घेत मोबाईल जप्त केला होता.तसेच त्याची चौकशी केल्यानंतर त्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. अखेर..आरोपी आरोपी बिक्रम महेंद्र ठाकुरी (वय २६ वर्षे , रा . मडगाव ,गोवा,मूळ मैतीदेवी, काठमांडु नेपाळ) हा गोवा येथे असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ ,पोलीस नाईक पांडुरंग पांढरे,पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांच्या पथकाने सोमवारी पहाटे ३.४५ वाजता गोवा मडगाव रेल्वे स्थानक बाजूला पुथपाठवर पकडले.त्याला आज अटक करत न्यायालयात हजर केलं असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अधिक तपास कणकवली पोलीस नाईक पांडुरंग पांढरे करीत आहेत.