*कोकण Express*
*आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस साधेपणाने केक कापून साजरा*
*सावंतवाडी ः प्रतिनीधी*
आमदार दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळो आणि जिल्ह्याची उन्नती करण्यासाठी उदंड आयुष्य आरोग्य लाभो अशी शुभेच्छा देत केक कापून त्यांचा वाढदिवस सावंतवाडी मध्ये साजरा करण्यात आला.
आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट या निवासस्थानी चैतन्य आबा केसरकर या कुटुंबीयातील युवकाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला चैतन्यचाही आजच वाढदिवस असल्याने आमदार केसरकर यांच्या वाढदिवसाचा केक सोबत त्यांनी आपल्याही वाढदिवसाचा केक कापला.
आमदार दीपक केसरकर यांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मुंबई येथे थांबावे लागले. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचा निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी केक कापून कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी सौ गीता सुकी व माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बिद्रे यांनी चैतन्य केसरकर याला केक भरूवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळून सावंतवाडी सह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आमदार केसरकर यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष अनारोजीन लोबो यानी आपल्या खास शैलीमध्ये हॅपी बर्थडे चे गीत गाईले तर माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्यासह माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, माजी सभापती अशोक दळवी, भारती मोरे ,शुभांगी सुकी, दिपाली सावंत, कीर्ती बोंद्रे, माजी पंचायत समिती सदस्य बबन उर्फ नारायण राणे, व्यापारी संघाचे नंदू शिरोडकर, जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, विश्वास घाग, गुंडू जाधव ,नंदू गावडे, उमेश गावकर, विशाल सावंत, संजय माजगावकर, प्रतीक बांदेकर, पांढरे सर, सौ शैलाजा पारकर, आबा केसरकर, उदय माडखोलकर, विशाल बांदेकर, महादेव राऊळ, गजानन नाटेकर, सुभाष गावडे, शिल्पा मेस्त्री, शैलेश मेस्त्री, रणजित सावंत आदी सह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त झाराप येथील जीवदान मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये व पणदूर येथील सविताश्रम अणाव येथील आनंदाश्रम या ठिकाणी वाढदिवसाच्या केक आणि रोख अकरा हजार रुपये भेट देण्यात आली.