*कोकण Express*
*अर्धवट स्थितीत असलेल्या खार बंधाऱ्यामुळे माड बागायती तसेच शेतजमीनीचे नुकसान*
*मनसे देवगड कार्यकरणी च्या वतीने उप अभियंता अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाहीसाठी दिले निवेदन*
*देवगड ः प्रतिनीधी*
देवगड तालुक्यातील जामसंडे बेलवाडी खाडी नजीक अर्धवट स्थितीत असलेल्या खार बंधाऱ्यामुळे माड बागायती तसेच शेतजमीनीचे प्रचंड नुकसान होऊन सभोवताली असलेल्या विहिरींचे पाणी खाडीच्या पाण्याने दुषित होत आहे या सर्व स्थिती संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड कार्यकारणीच्या वतीने शुक्रवार दिनांक १५ जुलै २०२२ रोजी मा.उप अभियंता यांच्या खार भूमी कार्यालयास भेट देऊन या संदर्भातील निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले,या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे संबंधित अधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळास सांगितले या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवगड तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, सचिव जगदीश जाधव, उप तालुकाध्यक्ष महेश नलावडे, उप तालुकाध्यक्ष हेमंत मोंडकर, विभाग अध्यक्ष परेश आडकर इत्यादी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.