*कोकण Express*
*वैश्य समाज गुणवंत विद्यार्थी, विदयार्थीनींचा २४ जुलै रोजी होणार गुणगौरव सोहळा*
*श्री श्री श्री वामना श्रम स्वामीजींची उपस्थिती*
*कणकवली ः प्रतिनीधी*
वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थी, विदयार्थीनींचा गुणगौरव सोहळा रविवार २४ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित केलेला आहे हा सोहळा श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजींच्या उपस्थितीत होणार आहे.या निमित्त जयंत मणेरकर आणि वैशाली मणेकर यांचे दहावी,बारावी, पदवी नंतर पुढे काय ? यासाठी व्यवसाय आणि नोकरी बाबत मार्ग दर्शन आयोजित केलेले आहे आणि ते सर्वांसाठी अत्यावश्यक आहे .
सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष वैश्य समाज तालुका कणकवली जि सिंधुदुर्ग आणि चातुर्मास सोहळा समिती करत आहे