*कोकण Express*
*घरफोडी प्रकरणी अटक केलेल्या संशयिताला ५ दिवसांची पोलीस कोठडी…*
*मालवण ः प्रतिनीधी*
जून महिन्यात मालवण शहरात घडलेल्या घरफोड्याच्या प्रकरणात मालवण पोलोसांनी काल मंगळवेढा येथून अटक केलेल्या सचिन राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय ३०, रा. पंढरपूर, सोलापूर) या संशयिताला आज मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून ऍड. तुषार भणगे यांनी काम पाहिले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मालवण शहरात महिन्याभरापूर्वी मालवणातील भर वस्तीतील तेजस मोतीराम नेवगी, महेश रामचंद्र परब, आणि ऋतुजा रवींद्र वारिसे यांची
बंद घरे अज्ञात चोरट्यानी फोडून लाखों रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी तेजस मोतीराम नेवगी यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
याप्रकरणी सुरू असलेल्या पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आलेल्या बॅग घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीच्या संचारा दरम्यान दिसून आलेल्या सफेद कारच्या वाहन क्रमांकावरून काढलेल्या माहितीवरून पोलिसांनी पंढरपूर येथील सचिन राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी याला मंगळवेढा येथून काल अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व चोरीतील रक्कमेपैकी ४ हजार २१० रुपये पोलीसानी जप्त केले आहेत. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून ऍड. तुषार भणगे यांनी काम पाहिले.