*कोकण Express*
*कणकवली तालुक्यातील सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत १६ डिसेंबरला…*
तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे होणार आहे.
२०२० ते २०२५ या कालावधी करता ही आरक्षण सोडत असणार आहे. यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे. या सोडत कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार्या प्रत्येक व्यक्तीला मास्क चा वापर करणे बंधनकारक असणार आहे. तसेच याठिकाणी समाजिक अंतर सोडणेही आवश्यक असल्याचे ते म्हणाले.