बांदा केंद्र शाळेच्या कनिष्का केणीची नवोदय विद्यालयासाठी निवड

बांदा केंद्र शाळेच्या कनिष्का केणीची नवोदय विद्यालयासाठी निवड

*कोकण Express*

*बांदा केंद्र शाळेच्या कनिष्का केणीची नवोदय विद्यालयासाठी निवड*

*बांदा  ः प्रतिनीधी*

जिल्हा परिषद बांदा नं 1 केंद्रशाळेतील विद्यार्थीनी कुमारी कनिष्का राजन केणी हिची सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.

यावर्षी देशभरातील नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश परीक्षा म्हणून नवोदयाची परीक्षा 30एप्रिल रोजी घेण्यात आली होती. मनुष्य बळ विकास मंत्रालय यांच्या मार्फत राबवल्या जात असलेल्या या विद्यालयात सहावीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण मिळते.

बांदा केंद्र शाळेची विद्यार्थीनी कनिष्का केणी हिची या निवड झाल्याबद्दल बद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री निलेश मोरजकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सिने अभिनेते अनिल गवस यांच्या हस्ते शाल‌ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर प्रा.रमाकांत गावडे,हेमंत मोर्ये, नेहा सावंत, प्रशांत गवस व पालक उपस्थित होते.

कनिष्का हिने यापूर्वी गणित प्रज्ञा परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले आहे तसेच विविध संघटना मार्फत आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सुयश प्राप्त करून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. कनिष्काला मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर वर्ग शिक्षक जे.डी पाटील ,ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक,पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा ‌सावंत ,रंगनाथ परब,जागृती धुरी, वंदना शितोळे,शितल गवस ,प्रशांत पवार ,गोपाळ साबळे व पालकांचे मार्गदर्शन लागले. कनिष्काने मिळवलेल्या यशाबद्दल केंद्र प्रमुख संदीप गवस ,विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!