सर्वांसाठी एक उज्ज्वल भविष्य, संधी, हक्क आणि निवड सुनिश्चित करण्या साठी आजचा दिवस : प्रा.तानाजी गोदडे

सर्वांसाठी एक उज्ज्वल भविष्य, संधी, हक्क आणि निवड सुनिश्चित करण्या साठी आजचा दिवस : प्रा.तानाजी गोदडे

 

*कोकण Express*

*सर्वांसाठी एक उज्ज्वल भविष्य, संधी, हक्क आणि निवड सुनिश्चित करण्या साठी आजचा दिवस : प्रा.तानाजी गोदडे*

११ जुलै हा दिवस दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून जागतिक लोकसंख्या दिन उत्साहपूर्ण साजरा करण्यात आला.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमच्या गव्हर्निंग कौन्सिलने १९८९ मध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

वर्ल्डोमीटरनुसार, या वर्षी जगाची लोकसंख्या सुमारे ८ अब्जांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ती साडेसात अब्जांपेक्षा जास्त होती.पूर्वी हा दिवस सण आणि उत्सव म्हणून साजरा केला जात होता व निरंतर विकासाची प्रार्थना केली जात होती. मात्र, सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे हा दिवस चिंता व्यक्त करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी एक निमित्त बनला आहे. जगभरातील लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल. असे सांगत चिंताजनक पातळीवर पोहोचलेल्या जगाच्या लोकसंख्येला कुठेतरी पूर्णविराम लागणे आवश्यक आहे कारण सर्वांसाठी एक लवचिक भविष्य, संधी, हक्क आणि निवड सुनिश्चित करणे हा या दिनाचे मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन केले.

वास्तविक, दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. पूर्वी ते वरदान होते, पण आता ते शाप बनले आहे. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

वाढत्या लोकसंख्येने बेरोजगारी, गरीबी, दारिद्र्य, उपासमार, निरक्षरता, विषमता, सामाजिक अस्थिरता इत्यादी समस्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते जी सर्वतोपरी घातक आहे, म्हणून लोकसंख्यावाढीच्या या पैलूंवर विचारमंथन करणे अत्यंत आवश्यक आहे असे मत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष जिल्हा समन्वयक मा.श्री.वसीम सय्यद यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे, मराठी विभाग प्रमुख सहा.प्रा.रश्मी देसाई, सहा.प्रा.प्रकाश शिंदे, सहा.प्रा.डॉ.वंदना शिंदे-व्हटकर, सहा.प्रा.तानाजी गोदडे, सहा.प्रा.गजानन व्हंकळी, सहा.प्रा.शर्मिन काझी, सहा.प्रा.रूची तेली,सहा.प्रा.प्रज्योत नलावडे, सहा.प्रा.माधवी पांचाळ, सहा.प्रा.समरीन काझी, सहा.प्रा.अक्षता मोंडकर, ग्रंथपाल श्री.तन्मय कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी गुरुनाथ भोसले, अदिती भालेकर आदी विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी कु.गुरुनाथ भोसले व आभार प्रदर्शन कु.यश राऊत यांनी केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.जयश्री इंगळे यानी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!