*कोकण Express*
*मुबंई भाजपाच्यावतीने चाकरमान्यांसाठी १०० रुपयांत “मोदी एक्सस्प्रेस”*
*२८ ऑगस्टला निगणार;कोकणातील चाकरमान्यांना संधी…*
*कणकवली ः प्रतिनीधी*
भारतीय जनता पार्टी , मुंबई तर्फे गणपतीसाठी कोकणात जाणा – या मुंबईतील कोकणवासीयांसाठी विशेष गाडी ‘ श्री मोदी एक्स्प्रेस ‘ रविवार २७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वा . दादर मध्य रेल्वे स्टेशन वरून सोडण्यात येणार आहे . सदर गाडी चिपळूण , रत्नागिरी , कणकवली व सावंतवाडी या स्टेशनांवर थांबेल . या एक्स्प्रेसचा जाण्या – येण्याचा खर्च मुंबई भाजपा करणार आहे . प्रवाश्यांची माहिती भरण्यासाठीचा गुगल फॉर्म सोबत पाठवत आहोत . याकरिता प्रत्येक मंडला मधून कोकणात जाणा – या ५० प्रवाशांची नावे ( नाव , वय , मोबाईल नंबरसह ) मंडल व जिल्हा अध्यक्षांशी चर्चा करून पाठवायची आहेत . प्रत्येकी रु .१०० शुल्क घेण्यात येणार आहे . आ . श्री . सुनिल राणे( संयोजक )9819600009,श्री सुहास आडिवरेकर ( सह संयोजक ) 969210552,श्री . महेश पारकर 9819084320, श्री . भालचंद्र शिरसाट 9820122657,श्री . राजेश शिरवडकर 9869313227,
श्री . राकेश नेवरेकर 9819946909,श्री संतोष मेढेकर 9594756666
या विषयात अधिक माहितीसाठी उपरोक्त प्रमुखांशी संपर्क करावा . असे आवाहन भाजपा मुबंई अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.