*कोकण Express*
*सांगवे सोसायटीतर्फे अल्प दरात कांदा विक्रीचा शुभारंभ*
*सिंधुदुर्ग :*
कांद्याच्या वाढीव दरामुळे जनतेची होणारी ससेहोलपट रोखण्यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी अल्प दरात कांदा उपलब्ध करून दिला आहे. कणकवली मधील सांगवे सोसायटीच्या वतीने माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते या अल्प दरातील कांदा विक्रीचा शुभारंभ करण्यात आला.
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या सौजन्याने सुमारे पाच टन कांदा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अंतर्गत सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा कांदा सांगवे विकास सोसायटी सांगवे यांनी बुधवारी ३० रुपये दरात उपलब्ध करून दिला. यावेळी सुरेश सावंत, सोसायटी चेअरमन वाळके, सरपंच रमेश महापणकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.