राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कालावधीत वाढ.

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कालावधीत वाढ.

*कोकण Express*

*राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कालावधीत वाढ..*

*मुंबई :*

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाचा कार्यकाळ हा अधिकृत राजपत्रातील आदेशाद्वारे राज्य सरकार तीन महिन्यांपर्यंत वाढवू शकते. हा कालावधी वाढविताना एकूण कालावधी हा कलम 10 मधील कालावधीशी सुसंगत असेल. या सुधारणेबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!