*कोकण Express*
*कणकवलीत 3 दुचाकी जाळल्या*
*एक दुचाकी वाचविण्यात यश*
*पहाटे ३ च्या दरम्यान आग लावल्याची घटना*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नागवे रोड येथे ढेकणे घरा जवळ ,रस्त्यालगत उभ्या केलेल्या ३ दुचाकींना बुधवार ९ डिसेंबर रोजी पहाटे ३ च्या दरम्यान आग लावल्याची घटना घडली. यात २ मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. तर एक दुचाकी प्रसंगसावधानातून वाचवण्यात यश आले. ती दुचाकी किरकोळ जळली आहे. त्यामध्ये पांडुरंग पवार यांची डिस्कवर, मोहिते प्लेझर,पाताडे यांची पॅसिनो,आशा प्रकारच्या दुचाकी असून ही आग बुधवार 9 रोजी पहाटे ३ च्या दरम्यान लागली की लावली गेली या बाबत उलट सुलट चर्चा होत आहे. करण गाड्या उभ्या असलेल्या घरा समोरील श्री निमनकर यांच्या घराला बाहेरून कडी घालण्यात अली होती असे त्यानी सांगितले. त्यामुळे गाड्याना आग लावतेवेळी कोणी बाहेर येऊन आपला प्लॅन फसू नये या उद्देशाने कडी लावली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पहाटेच घटनास्थळी येऊन पाहणी करून गेले आहेत. व पुढील तपास पोलीस करत आहेत. आग लावण्याची घटना कणकवलीत घडल्याने कणकवलीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी कणकवलीत गाड्यांना आग लावण्याचे प्रकार अनेकदा घडलेले असल्याने हा प्रकार नेमका कशातुन झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.