*कोकण Express*
*अगोदर आपल्या मुलाला खासदार विनायक राऊत यांनी सुधारावे !*
*नारायण राणे हे देशाचे कॅबिनेट मंत्री, त्यांच्यावर बोलण्याएवढी खासदार विनायक राऊत यांची क्षमता नाही*
कणकवली भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची टीका
*कणकवली : प्रतिनीधी*
ओसरगाव येथील टोल नाक्यासाठी टोलचे कंत्राट मिळवण्यासाठी केंद्रीय स्तरावर पायघड्या घालणारे विनायक राऊत यांची टोलनाक्यावरची टोल कंत्राटातील भागीदारी यापूर्वीच उघड झाली आहे. नारायण राणे हे देशाचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्यावर बोलण्याएवढी खासदार विनायक राऊत यांची क्षमता पण नाही. दोन वेळा निवडून येऊन खासदार विनायक राऊत यांना त्यांच्याच पक्षातले जिल्ह्यात कोण जुमानत नाही. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना भाजप सोबत आली आहे. अशा वेळी निष्ठेचे प्रमाणपत्र घेण्यासाठी खासदार विनायक राऊत हे सिंधुदुर्गात फिरत आहेत. मात्र त्यांची निष्ठा टोलच्या कंत्राटामध्ये अडकली आहे हे सिंधुदुर्गवासीयांना व त्यांच्याच पक्षातल्याना माहिती आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या मुलांची चिंता करावी असा आरोप करणाऱ्या विनायक राऊत यांनी अगोदर आपल्या मुलाने कणकवली पटवर्धन चौकात जो धुडगूस घातला होता जनतेचे सेवक असलेल्या वाहतूक पोलिसाला मारले होते आणि मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे असे गुर्मीने सांगत होता अशा वाया गेलेल्या स्वतःच्या मुलालाच राऊत यांनी सुधारावे. असा टोला भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी लगावला आहे.
शिवसेनेचे दुकान बंद झाले असून, ज्यांना स्वतःची निशाणी सांभाळता येत नाही त्यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांच्यावर बोलू नये. शिवसेने बाबत नारायण राणे यांनी जे भाकित केलं होतं ते खरं ठरलं. त्यामुळेच खासदार विनायक राऊत मनस्थिती बिघडल्यासारखे करत आहेत. इतरांना निष्ठेचे सल्ले देणारे खासदार विनायक राऊत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. त्यावेळी त्यांची निष्ठा कुठे जाते? शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटात दाखल होत आहेत त्यात खासदार विनायक राऊत यांचा देखील नाव आहे असा दावा श्री मेस्त्री यांनी केला. सत्ता गेल्यामुळे दिलेली खोटी आश्वासने पाळली नसल्याने जनतेला उत्तर द्यायची हिंमत नाही. खोटी आश्वासने पाळली नसल्याने जनता मागे लागेल या भीतीने राऊत यांना सोबत गुंड घेऊन फीरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांनी पुढच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे असे भाजपा चे आव्हान आहे. हिम्मत असेल तर आव्हान स्वीकारा असेही श्री मेस्त्री यांनी म्हटले आहे.