*कोकण Express*
*कणकवली तालुका भाजपा महिला उपाध्यक्ष पदी सौ. संजना सदडेकर*
भाजपा शहर मंडल महिला तालुका उपाध्यक्षपदी सौ. संजना संजय सदडेकर यांची निवड करण्यात आली आहे. सौ.सदडेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री भाजपा नेते, खासदार नारायण राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी सौ.निलमताई राणे, नगराध्यक्ष समिरनलावडे,नगरसेवक सौ.मेघा गांगण,प्रतीक्षा सावंत आदी उपस्थित होते.
कणकवली तालुक्यात शहर मंडळ मध्ये चार जिल्हा परिषद आणि कणकवली शहराचा समावेश आहे.त्यात उपाध्यक्ष म्हणून सौ.संजना सदडेकर यांची तालुका अध्यक्ष सौ.हर्षदा वाळके यांनी निवड केली आहे. या निवडी बद्दल सर्वच स्थरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.