*कोकण Express*
*कंझ्युमर सोसायटीची निवडणूक बिनविरोध…!*
*सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप नलावडे तर व्हा.चेअरमनपदी अण्णा कोदे यांची पुन्हा एकदा निवड…!*
*नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्य बंडू हर्णे यांनी केले अभिंदन…!*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली शहरातील सहकार क्षेत्रातील महत्वाची असलेल्या कंझ्युमर सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप नलावडे तर व्हाईस चेअरमनपदी अण्णा कोदे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्य बंडू हर्णे यांची त्यांचे अभिनंदन केले.
८ जुलैला कंझ्युमर सोसायटीची निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली. यात संचालक मंडळावर संदीप बाळकृष्ण नलावडे, सुरेंद्र सुधाकर कोदे, महेश चंद्रकांत नार्वेकर, संतोष काशिनाथ पारकर, रघुनाथ बाळकृष्ण कोरगावकर, स्वरुप प्रकाश सापळे, सखाराम धर्माजी जाधव, शैलेंद्र वामन डिचोलकर, रवींद्रनाथ वसंत मुसळे, सविता अरविंद मुंज, पूजा नीलेश माणगावकर हे उमेदवार निवडून आले आहेत. सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप नलावडे तर व्हाईस चेअरमनपदी अण्णा कोदे
यांची पुन्हा एकदा निवडकरण्यात आली. या निवडीबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी श्री. नलावडे व श्री. कोदे यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालक मंडळाने सहकार क्षेत्रात सोसायटीचा नाव लौकीक वाढवावा, अशी अपेक्षा नगराध्यक्षांनी व्यक्त करत संचालक मंडळावर बिनविरोध निवडून आलेल्यांचे देखील त्यांनी अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे, अनिल डेगेवकर, किशोर राणे, बंडू गांगण, नीलेश माणगावकर, सचिन नलावडे, रुपेश पेडणेकर, धोंडी वाळके, श्री. बोभाटे आदी उपस्थित होते.