जिजाऊ फाऊंडेशन सीबीएससी दर्जाची शाळा उभारत मोफत शिक्षण देणार

जिजाऊ फाऊंडेशन सीबीएससी दर्जाची शाळा उभारत मोफत शिक्षण देणार

*कोकण Express*

*जिजाऊ फाऊंडेशन सीबीएससी दर्जाची शाळा उभारत मोफत शिक्षण देणार*

*गोट्या सावंत;कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये दीड लाख वह्यांचे वाटप होणार*

कणकवली ःः प्रतिनीधी*

जिजाऊ शैक्षणिक संस्था अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून गेली पाच वर्षे वह्या वाटप केले जात आहे.यावर्षी कणकवली तालुक्यात विद्यार्थ्यांना दीड लाख वह्या वाटप करत आहोत.गरिबांसाठी सामाजिक बांधिलकी जपत निलेश सांबरे काम करत आहेत.भविष्यात कणकवलीत जिजाई फाऊंडेशन माध्यमातून सीबीएससी दर्जाची शाळा उभारत सर्वसामान्य मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निलेश सांबरे यांचा संकल्प असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले.

आशिये,सातरल,कासरल या गावांमध्ये जिजाऊ फाउंडेशन व युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत वह्यावाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.आशिये उपसरपंच संदीप जाधव,माजी सरपंच शंकर गुरव,सातरल सरपंच प्रदिप राणे, कासरल सरपंच गुरू चव्हाण, सोसायटी चेअरमन दत्ताराम आमडोस्कर, रवींद्र राणे, बाबू राणे, सुशील राणे, समीर राणे, सुहास बागवे, प्रसाद सावंत, विनोद परब, सुशील तिरलोटकर,मुख्याध्यापिका अनघा लाड,शिक्षक जातेकर, सावंत मॅडम,मोरे मॅडम शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी गोट्या सावंत म्हणाले,

पालघर येथील आदिवासी भागात गोरगरीब लोकांसाठी काम करणारे निलेश सांबरे आमचे मित्र आहेत. जिजाऊ फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी भागात सिबीएससी दर्जाच्या ६ स्कुल मोफत शिक्षण हजारो विद्यार्थ्यांना देत आहेत.गरिबांसाठी रुग्णालय,

रुग्णांना १५ रुग्णवाहिका,दरवर्षी ५ लाख वृक्ष लागवड ,यूपीएससी एमपीएससी मुलांसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचे काम निलेश सांबरे करत आहेत. त्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत सिबीएससी दर्जाची मोफत शाळा सुरु करण्याचा मानस आहे.मी युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि ते जिजाई फाऊंडेशन मार्फत एकत्र काम करण्यामागचा एकच सामाजिक बांधिलकी हा हेतू आहे.मुलांना वह्या वाटप हा खारीचा वाटा आहे.नजीकच्या काळात या आशिये शाळेला चांगली इमारत देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी उपसभापती महेश गुरव म्हणाले, ,तळागाळातील जनतेसाठी गोट्या सावंत चांगले काम करत आहेत.

जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उभारलेले काम गौरवास्पद आहे.आता या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे नावलौकिक वाढविण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.

आशिये,सातरल,कासरल या गावातील १०२ विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप गोट्या सावंत,महेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!