*कोकण Express*
*सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीत “मेकेट्रॉनिक्स इंजिनिअरींग” अभ्यासक्रम सुरू ; अच्युत भोसले*
सावंतवाडीत संख्या लक्षात घेता भविष्यात हमखास रोजगार मिळवून देणारा “मेकेट्रॉनिक्स इंजिनिअरींग” हा नवीन शैक्षणिक उपक्रम सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीमध्ये सुरू करण्यात आला आहे. हे शिक्षण घेतल्यानंतर थेट नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. कोकणात प्रथमच आमच्या महाविद्यालयाला हा मान मिळाला आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष अच्युत भोसले यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान यापुर्वी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या तीन ठिकाणी हा अभ्यासक्रम शिकविणारी चार महाविद्यालये आहेत. आता मात्र सावंतवाडीत ही संधी निर्माण झाली असून पहिल्या टप्प्यात ३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्याच बरोबर कॉम्प्युटर सायन्स या उपक्रमाची क्षमता ९० इतकी झाली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. भोसले आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्राचार्य गजानन भोसले व समन्वयक अधिकारी नितीन सांडये आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, हा कोर्स उपलब्ध असणारे कोकणातील हे पहिले महाविद्यालय आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना यापूर्वी मुंबई,पुणे, औरंगाबाद येथे हा कोर्स करण्यासाठी जावे लागत होते. मात्र आता सावंतवाडीत मेकेट्रॉनिक्स इंजिनिअरींग कोर्स केल्यानंतर नोकरीची हमखास संधी मिळणार आहे. या कोर्सची प्रवेश फी ६२ हजार इतकी आहे.मात्र अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. तर भंडारी आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना यातील ५०% फी भरून प्रवेश मिळणार आहे. पहील्या टप्प्यात ३० विद्यार्थ्याना प्रवेश मिळणार आहे.पुढील वर्षात ६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्याच बरोबर कॉम्प्युटर सायन्स या उपक्रमाची क्षमता ९० इतकी झाली आहे.असे ही त्यांनी यावेळी सांगितले.विद्यार्थ्यांनी आता मेकेट्रॉनिक्स इंजिनिअरींग शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अधिक माहितीसाठी महाविद्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन श्री सावंत भोसले यांनी यावेळी केले आहे.