शहरातील छत्रपतींच्या जुन्या पुतळ्याचे विधीवत पूजन करून स्थलांतरण

शहरातील छत्रपतींच्या जुन्या पुतळ्याचे विधीवत पूजन करून स्थलांतरण

*कोकण Express*

*शहरातील छत्रपतींच्या जुन्या पुतळ्याचे विधीवत पूजन करून स्थलांतरण…*

*समीर नलावडे ; लवकरच पुतळा परिसराचे सुशोभिकरण…*

कणकवली,ता.०९: शहरातील छत्रपतींच्या जुन्या पुतळ्याचे विधीवत पूजन करून तो पुतळा नगरपंचायतीच्या सभागृहात ठेवण्यात आला आहे. तर नवीन पुतळा ज्‍या जागेत बसविण्यात आला आहे. त्‍या जागेचे सुशोभिकरण लवकर केले जाणार आहे. नगरपंचायतीच्या अभियंत्‍यांकडून त्‍याबाबतचा आराखडाही तयार करण्यात आला आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली.

येथील नगराध्यक्ष दालनात श्री.नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजित मुसळे, किशोर राणे आदी उपस्थित होते. श्री.नलावडे यांनी पुतळा स्थलांतर करण्याची कामगिरी करणारे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांचेही आभार मानले. आमदार नीतेश राणे यांनीही या प्रकरणात महत्‍वाची भूमिका निभावली. याखेरीज जिल्‍हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आदींनीही याकामी मोठी कदत केली. त्‍यांचेही आपण आभार मानत असल्‍याचे श्री.नलावडे म्‍हणाले.

कणकवली नगरपंचायतीच्यावतीने आम्‍ही जी पाचशे चौरस मिटरची जागा सुचवली होती. त्‍याच जागेत छत्रपतींचा पुतळा अज्ञात शक्‍तींनी बसवला आहे. आता पुतळा असलेल्‍या परिसराचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्‍याचा आराखडाही नगरपंचायतीने तयार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती, मराठा समाज संघटनांचे प्रतिनिधी या सर्वांना विश्‍वासात घेऊनच पुढील कार्यवाही करणार असल्‍याचेही श्री.नलावडे म्‍हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!