राष्ट्रवादीने पूरस्थीतीवर नियत्रण आणण्यासाठी दिलेल्या सायरनचे करण्यात आले उदघाटन

राष्ट्रवादीने पूरस्थीतीवर नियत्रण आणण्यासाठी दिलेल्या सायरनचे करण्यात आले उदघाटन

*कोकण Express*

*राष्ट्रवादीने पूरस्थीतीवर नियत्रण आणण्यासाठी दिलेल्या सायरनचे करण्यात आले उदघाटन*

*सावंतवाडी:-प्रतिनीधी*

बांद्यातील नागरीक पुरस्थीतीत सामना करण्यासाठी नेहमी सतर्क आहेत. हे मी गेले चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसात पाहीले. एक वर्षात बांद्यावासियांचे आपुलकीमुळे खुप जवळचे नाते निर्माण झाले. पुढील चार दिवसात पुरस्थीती निर्माण झाल्यास योग्य नियोजन केले आहे. सायरन मुळे नागरीकांना सतर्कतेचा ईशार मिळणार आहे. तरी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील व घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. स्थानिक नागरीकांचे घाबरुन जाऊ नये. असे आवाहन बांदा सहाय्यक पोलीस निरिक्षक श्यामराव काळे यांनी केले.

श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा आळवाडा येथे बुधवारी सायंकाळी सायरनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काळे बोलत होते.

बांद्यात गेले दोन वर्षे पुरस्थीती होऊन बांद्यातील तसेच परिसरातील व्यापार्यांचे अतोनात नुकसान झाले होते. आपत्ती व्यवस्थापन भाग म्हणुन बांदा शहरातील व्यापारी वर्गाला व जनता जनार्दनाला पाऊसाळ्यात तेरेखोल नदीला येणा-या पुराच्या पाण्याचा तडाखा बसु नये, व्यापारी सतर्क व्हावे. सावध करता यावे यासाठी सिंधुदूर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार्यातून श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा या मंडळाला सायरन भेट देण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर,सरपंच अक्रम खान,ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, बाळु सावंत, मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, संकल्प केसरकर,मंगलदास सांळगावकर, दर्शना केसरकर, गाैरांग शेर्लेकर विलास आळवे, साई तेली, रविंद्र मालवणकर, राजेश कारेकर, प्रितम हरमलकर,, संदेश‌ पावसकर, मनोज कल्याणकर ज्ञानेश्वर केसरकर,सतीश नाटेकर,गौरांक शेर्लेकर,रुषी हरमल कर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!