*कोकण Express*
*वैभववाडीत संजय गांधी योजनेच्या 22 प्रकरणांना मंजुरी*
वैभववाडी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती बैठकीत एकूण 22 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक गुरुवारी अध्यक्ष मंगेश लोके यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार अशोक नाईक, समिती सदस्य व संजय गांधी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
मंजूर करण्यात आलेल्या 22 प्रकरणांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून 13 प्रकरणे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून 7 प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनामधून 2 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.