*कोकण Express*
*शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन*
*कणकवलीत रात्रीस खेळ चाले या धर्तीवर अनेक रात्रीचे कार्यक्रम…*
*शिवसेना नेते संदेश पारकर यांचा आरोप*
*कणकवल : प्रतिनीधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दाखल झालेले शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आल्यानंतर कणकवली छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करत गौरीशंकर खोत यांनी शिवसेनेच्या पक्ष वाढीच्या कामाचा आजपासून नव्याने श्री गणेशा केला. गौरीशंकर खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कणकवलीत रात्रीस खेळ चाले या धर्तीवर अनेक रात्रीचे कार्यक्रम होतात असा आरोप शिवसेना नेते संदेश पारकर यांनी नवीन पुतळा स्थापने बाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, सचिन सावंत, रामदास विखाळे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, नगरसेवक कन्हैया पारकर, संजय पारकर, दामू सावंत, सुनील पारकर, भास्कर राणे, संजय पारकर आदि उपस्थित होते.