शिवसेना पक्ष कदापी संपणार नाही ; गौरीशंकर खोत

शिवसेना पक्ष कदापी संपणार नाही ; गौरीशंकर खोत

*कोकण Express*

*शिवसेना पक्ष कदापी संपणार नाही ;
गौरीशंकर खोत…*

*बंडखोरांना शिवसैनिक जागा दाखवेल…!*

*आ.दीपक केसरकर यांची ही शेवटची आमदारकी…!*

*कणकवली : प्रतिनीधी*

शिवसेनेने सर्वसामान्य लोकांना मोठ्या पदांपर्यंत पोहोचवलं आहे. कोण आमदार, तर कोणाला खासदार केलं, मंत्री केलं तेच लोक बंडखोरी करत शिवसेना संपवण्याची भाषा करत आहेत. शिवसेना कदापी संपणार नाही कारण यापूर्वीही अनेक संकटांना तोंड देत शिवसेनेने उभारी घेतली.बंडखोरांना शिवसैनिक जागा दाखवेल.आ.दीपक केसरकर यांचा शेवटचा टर्म,पुन्हा निवडून येणार नाहीत.एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी शिवसेनेमुळे अपार सत्तेची पदे भोगली असल्याचा आरोप शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी केला.

कणकवली येथील विजय भवानी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपनेते गौरीशंकर खोत बोलत होते. यावेळी आ.वैभव नाईक,सतीश सावंत,महिला आघाडी प्रमुख निलम पालव,संदेश पारकर,शैलेश भोगले आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

माझी शिवसेना उपनेते पदी निवड झाली आहे,त्यामुळे स्वागत झालं .आता शिवसेनासाठी कठीण काळ नाही,अशी अनेक संकटे आली आहे.भविष्यात शिवसैनिक अजून जिद्दीने काम करतील.जे लोक अपार सत्ता उपभोगून शिवसेनेला बाजूला करत सरकारमध्ये गेले आहेत.त्यांना जागा दाखविण्यात येईल.आ.केसरकर यांनी किती पक्ष बदलले आहेत,हे जनतेला माहीत आहेत.स्वतः मंत्री पदासाठी शिवसेनेत आले.आता शिवसेनेवर टीका करत आहेत.जिल्ह्यातील शिवसेना मजबुत आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गड अभेद्य राहील,असा विश्वास गौरीशंकर खोत यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!