*कोकण Express*
*सांस्कृतिक मंडळाच्या प्रतिनिधिची १३ रोजी कणकवली येथे बैठक..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सातत्याने कार्यरत असलेल्या विविध सांस्कृतिक मंडळाचे कार्य एकसंघपणे चालावे यासाठी विचारविनिमय करण्यासाठी लावण्यासिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्था सिंधुदुर्ग तर्फे येत्या रविवार दिनांक १३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता कणकवली, तेलीआळी येथे विविध सांस्कृतिक मंडळानंच्या प्रतिनिधीनची बैठक श्री.भवानी मिटिंग हॉल, मनसे कार्यालयानजिक येथे आयोजित करण्यात आलेली असून त्यास जिल्ह्यातील सांस्कृतिक मंडळानंच्या अध्यक्ष, सचिव किंवा प्रतिनिधिनी उपस्थित रहावे असे आवाहन लावण्यसिंधु लोककला व चित्रपट सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक संस्था व मंडळे चित्रपट, लघुचित्रपट, शॉर्टफिल्म, व इतर प्रकारे निर्मिती करीत आहेत. लोकडाऊनच्या काळातही कांही कलाकारांनी शॉर्टफिल्म, वेबंस्टोरीएस सादर केल्या. अशा कलाकारांना एकत्र आणणे, कलाकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडणे,त्यांचे मानधन व इतर प्रश्न सोडविणे, एकत्र येऊन तालुकावार काम करणे वगैरे विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुफिल्मसिटी निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येऊन शासन दरबारी पाठपुरावा करणे याविषयी चर्चा होणार आहे.
तरी बहुसंख्य मंडळानंच्या प्रतिनिधिनी यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.