*कोकण Express*
*सहवेदना :- श्रीमती शुभांगी अनंत वरुणकर*
*कासार्डे : संजय भोसले*
तळेरे चाफार्डेवाडी येथील रहिवासी श्रीमती शुभांगी अनंत वरुणकर (वय ७३) यांचे नुकतेच दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा,सुन,दोन मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
माजी मुख्याध्यापक कै.अनंत वरुणकर यांच्या त्या पत्नी होत.तसेच तळेरे बाजारपेठेतील मॅकेनिक व्यावसायिक बापू वरुणकर यांच्या आई होत.तसेच शिडवणे प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ.सीमा वरुणकर यांच्या सासू होत.