*कोकण Express*
*मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल देवेंद्र पावसकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा*
*माजी आमदार प्रमोद जठार यांचे कणकवली पोलीस निरीक्षक यांना निवेदन*
*कणकवली ःः प्रतिनीधी*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध सोशल (फेसबुक) मीडियावर देवेंद्र पावसकर यांनी दि 5 जुलै रोजी अतिशय अर्वाच्य भाषेत मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अश्लील स्वरूपात जाहीर टीका केली आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक तथा मुख्यमंत्री यांना संविधानाने प्राप्त विशेष पदाचा फार मोठा अपमान, अवमान तसेच मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत आक्षेपार्ह बेकायदेशीर अश्लील जाहीर टीका टिप्पणी हि कायद्याने गुन्हा असल्याने व सर्वात महत्वाचे सदर पोस्ट/टीका हि जाहीर झाल्याने समाजात राजकीय तेढ निर्माण होऊन शांतता भंगदेखील होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करत देवेंद्र पावसकर यांनी त्यांच्या पूर्ण शुद्धीत केलेल्या बेकायदेशीर कृत्याची गंभीर दखल घेऊन IT कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन भाजपा सचिव तथा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या वतीने भाजपचे युवा मोर्चा कार्यकर्ते संतोष पुजारे, सर्वेश दळवी, प्रसाद देसाई यांनी कणकवली पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.