शिरवंडेत भरधाव डंपरने सरपंचाला उडवले

*कोकण Express*

*शिरवंडेत भरधाव डंपरने सरपंचाला उडवले…*

*श्रावण सरपंच प्रशांत परब गंभीर जखमी ; डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याची सुनील घाडीगावकर यांची मागणी…*

*मालवण ः प्रतिनिधी*

तालुक्यातील शिरवंडे मार्गावर काल सायंकाळी भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत श्रावणचे सरपंच प्रशांत परब हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुचाकीवरून प्रवास करताना हा अपघात झाला.
दरम्यान अपघातास १५ तास उलटूनही अद्याप डंपर चालकावर गुन्हा दाखल न झाल्याने पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर यांनी पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भरधाव वेगात जाणारा डंपर हा वाळू भरण्यास जात होता. डंपर चालकाकडे इन्शुरन्स व अन्य कागदपत्रेही नव्हती. तरी गंभीर अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकावर गुन्हा दाखल न झाल्यास आपल्याला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिकाही घ्यावी लागेल. आमच्यासाठी आमच्या माणसांचे जीव सर्वाधिक महत्वाचे आहेत. असेही घाडीगावकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!