कोकणात ‘भारत बंद’चा उडाला फज्जा

*कोकण Express*

*कोकणात ‘भारत बंद’चा उडाला फज्जा – प्रमोद जठार*

*महामार्गाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करत राहणार; जिल्हा बँकेची भाकरी करपायच्या आधी परतण्याची वेळ आली….*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भारत बंद असताना कांद्याच्या विक्री मुळे बंदचा फज्जा उडाला आहे. केंद्र सरकारने कायदे केले आहेत, त्याचा असाच फायदा होईल. शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यवस्था करायला सोपं होईल. महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार एपीएमसी मार्केट बंद झाले हे आत्मचरित्रात लिहलं आहे. दलाल आहेत, हे भारत बंदचा अडता करत आहेत. तर कोकणात भारत बंदचा फज्जा उडाला असल्याची टिका रत्नागिरी जिल्हा प्रभारी चिटणीस प्रमोद जठार यांनी केली. तसेच भाकरी करपायच्या अगोदर परता नाहीतर संचयनी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते त्या मार्गाने निघाले आहेत,असा टोला त्यांनी लगावला. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस रविंद्र शेट्ये, नगरसेवक शिशिर परुळेकर, मुबंई प्रदेश ओबीसी सेल अध्यक्ष नरेंद्र गावकर, उपाध्यक्ष रवी करमलकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दौऱ्यावर १८, १९, २० डिसेंबरला राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा येत आहेत. त्यादिनी प्रमुख म्हणून प्रमोद जठार यांना पक्षाने जबाबदारी दिली आहे. माझ्या रूपाने संपूर्ण कोकणचा सन्मान झाला आहे. तर हमी भाव कुठेही बंद करा, असे म्हटले नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दलालाना कायद्याच्या चौकटीत आणले आहे. दलालाना कडक कायदे केले आहेत. काँग्रेस व अन्य मंडळींनी उपाययोजना करताना स्वागत केले पाहिजे, असे प्रमोद जठार यांनी सांगितले.

श्री. जठार पुढे म्हणाले, केंद्राच्या योजनांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. परशुराम घाट रखडलेल्या प्रश्न मार्गी लागला आहे. ट्रस्टी ५० व कुळांना ५० टक्के जमीन देणार आहेत. चिपळूण ४५ मीटर जमीन भूसंपादन, राजापूर, तळेरे, कणकवली व अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. कणकवलीत कोसळल्या भागात गर्डर टाकून हे पूल उभारण्याचे उद्दिष्ट आहे, ते टेक्निकल गोष्ट आहे. कणकवलीत कोसळल्या भागातील काम वाढीव तरतूद आहे. कोरोनामुळे निधी कमी आहे, त्यामुळे अडचण आहे. २०२४ पूर्वी मुबंई ते गोवा पूर्ण महामार्ग वाहतूकीस खुला होईल, असेही प्रमोद जठार यांनी सांगितले.

तसेच जनतेची प्रगल्भता खासदारांना नाही. नाणार प्रकल्पला विरोध करत लोकांच्या पोटावर मारु नका. ठाकरे सरकारने पहिल्यांदा अधिसूचना काढा, मग पहा,जनतेला हवा तर करा, नाहीतर प्रकल्प करु नका. विरोध करणारे खासदार कोण? नाणार झाला असता एम्स आलं असत. दीड लाख रोजगार मिळला असता, आर्थिक राजधानी मुबंई व गोव्यात पर्यटनाला जोडणारा सिंधुदुर्ग कॉरिडॉर झाला असता हे लक्षात ठेवलं पाहिजे.

प्रकल्पात नोकर भरतीचा प्रमुख विनायक यांना करा. शिवसैनिकाना पहिले भरा, पण विरोध करुन दिशाभूल करु नका. दलाल म्हटल्यावर विनायक राऊतांनी दलाली जाहीर करा, नाहीतर माफी मागा. यावर काहीच बोलले नाही. कुठे आहेत खासदार?बेरोजगारांचा काय दोष आहे? आमचा दोष काय? कोकणच्या डोक्यावर पाप का फोडता? जमिनी तुम्ही घेतली, दलाली तुम्ही केली? असा आरोप देखील प्रमोद जठार यांनी केला.

प्रकल्पाला विरोध करणारे नेते आणि आणणारे कोण? हा प्रकल्प विदर्भातील लोक न्यायला तयार आहेत. खासदार विरोध करतात. आपलंच नाणं खोटं आहे. एमआयडीसीत रीसर्च सेंटरला जागा द्यायला वेळ लागतो. यावर आम. वैभव नाईक, दीपक केसरकर यांचे तोंड बंद का? शिवसेना ही कोकण विरोधी आहे, असा टोलाही प्रमोद जठार यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!