*कोकण Express*
*8000633872 वरुन आलेल्या व्हॉट्स ॲप संदेशावर विश्वास ठेवू नये*
*जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन*
*सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जि.मा.का.)*
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचा फोटो डीपीला लावून 8000633872 या क्रमांकावरून अमेझॉन पे गिफ्ट कार्डबाबत विचारणा करणारे खोटे संदेश विविध अधिकाऱ्यांना पाठवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. या क्रमांकावरून आलेल्या संदेशावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. याबाबत तपास करून कारवाई करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे.