कासार्डेत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड लाखोंच्या रोकडसह मुद्देमाल जप्तत

कासार्डेत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड लाखोंच्या रोकडसह मुद्देमाल जप्तत

*कोकण Express*

*कासार्डेत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
लाखोंच्या रोकडसह मुद्देमाल जप्तत*

*सिंधुदुर्ग*

कासार्डे येथील बंद असलेल्या सोशल क्लब मध्ये जुगार सुरू असल्याची टोल फ्री नंबरवर तक्रार केल्यानंतर कणकवली पोलिसांनी धाड टाकून 11 आरोपींना रंगेहाथ पकडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कासार्डे येथील त्या बंद सोशल क्लबमध्ये जुगार सुरू असल्याची तक्रार अज्ञाताने टोल फ्री नंबरवर केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांनी केलेल्या सूचनेनुसार कणकवली पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, कॉन्स्टेबल किरण मेथे, महिला पोलीस नाईक विनया सावंत, चालक किरण कदम यांच्या पथकाने जुगार खेळत असलेल्या ठिकाणी धाड टाकली. 11 आरोपीना रंगेहाथ पकडून लाखो रुपये जप्त केले असून आरोपीना कणकवली पोलीस ठाण्यात आणले. जप्त केलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!