वाघेरी येथे कृषिकन्यांकडूनयोग दिवस साजरा

वाघेरी येथे कृषिकन्यांकडूनयोग दिवस साजरा

*कोकण Express*

*वाघेरी येथे कृषिकन्यांकडूनयोग दिवस साजरा*

*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*

ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत गावामधे आलेल्या कै. राजाराम मराठे कृषिमहािद्यालयातील चतुर्थ वर्ष पदवी मध्ये शिकणाऱ्या कृषिकन्यान कडून वाघेरी गावातील प्राथमिक शाळेला भेट देऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
कृषि कार्यानुभव कार्यक्रमातील एक भाग म्हणून कृषिकन्यानी शाळेमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली , या मध्ये योगासनाचे शरीराला होणारे फायदे , योगा मुळे शरीर कसे सुदृढ राहील हे पटवून दिले .


त्याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता सावंत मॅडम. पदवीधर शिक्षक श्री. विजय पाताडे सर, पदवीधर शिक्षिका.सौ.नम्रता सावंत मॅडम, सुलभा तांबे मॅडम, लीना नीखाडे मॅडम. आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते .
या वेळी कृषिकन्या प्रतिक्षा भिऊंगडे, सुचिता पाटील, अनुराधा पाटील, प्राजक्ता वाळवेकर, प्रतिक्षा शिरगावकर, भक्ती परब, प्रतिमा पवार आणि स्वाती शिंदे यांना पुषपगुच्छ देवून
शिक्षक वर्गानी सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!