*कोकण Express*
*मुलींनी स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घेतली पाहिजे*
*रोट.श्रद्धा पाटकर*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये सावित्रीबाई फुले महिला विकास कक्ष व रोटरॅक्ट कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने *मासिक पाळी व आरोग्य* या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवलीच्या अध्यक्षा रोट.श्रद्धा पाटकर म्हणाल्या की मुलींनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. विशेषतः ही काळजी मासिक पाळीच्या काळात घेणे अत्यंत गरजेचे आहे. मासिक पाळी संदर्भात आजही समाजातअनेक गैरसमज आहेत. या गैरसमजापोटी मुलींना खूप ताणतणावात वावरावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक व शारीरिक अवस्थेवर होतो, असे सांगितले.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. विद्या मोदी म्हणाल्या की आजच्या जगात मुलींनी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. आपल्यावर काही नैसर्गिक बंधने येतात. परंतु त्याच्या अज्ञानातून आपण बाहेर पडल्यास आपल्याला बळ प्राप्त होते आणि समाजात वावरताना आत्मविश्वास निर्माण होतो. जीवनातील कोणतेही पूर्ण ज्ञान आपली प्रगती करते. मग ते आरोग्याचे सूद्धा असू शकते. आपल्या आरोग्याची काळजी मुलींनी नीट घेतली तर त्या सकारात्मकने वागू शकतात. आमच्या काळात आई अशिक्षित होत्या पण आता परिस्थिती बदलली आहे. तुमच्या आई-शिक्षित आहेत त्याचबरोबर तुम्हीही शिक्षित आहात त्यामुळे आरोग्याचे ज्ञान आपण स्वतः मिळवले पाहिजे.
डॉ. राजाराम पाटील म्हणाले की आरोग्याची काळजी घेताना हवामानाचा विचार करून आहार घेतला तर आपले आरोग्य चांगले राहते. त्याचबरोबर वातावरण योग्य कपडे परिधान करून आरोग्याची काळजी घेऊ शकतो.
आपल्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले यांनी शिक्षित स्त्री ही समाजाची मार्गदर्शशिकाअसते. एक स्त्री शिकली की सगळे कुटुंब शिक्षित होते. मुलींच्या आरोग्याची काळजी आई जेवढे घेते तेवढे कोणीही घेऊ शकत नाही. परंतु आता काळ बदलला असून आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घेतली पाहिजे. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या वेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली यांच्यावतीने विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीनचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्या मोदी यांनी केले तर आभार सहाय्यक प्रा. नम्रता मंचेकर यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.