*कोकण Express*
*स्व सुनिल तळेकर ट्रस्टच्या रक्तदान शिबीराला भरभरून प्रतिसाद*
*कासार्डे ः संजय भोसले*
तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर यांच्या २५ व्या स्मृती वर्षानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले. गेली 25 वर्षे स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्टकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिराचे उद्घाटन प्रतिथयश डॉक्टर आणि लेखक डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, चंद्रकांत तळेकर, डी. एस. पाटिल, श्रीनिवास पळसुले, नारायण वळंजू, हेमंत महाडीक, सतिश मदभावे, अशोक तळेकर, डॉ. अभिजित कणसे, हनुमंत तळेकर, शशांक तळेकर, सिंधुदुर्ग रक्तपेढीच्या डॉ. तनपुरे आदी उपस्थित होते.
तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट, स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने रक्तदान शिबिरासह सामाजिक, क्रिडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, आरोग्य अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबविले जातात.
गेली 25 वर्षे सातत्याने रक्तदान घेऊन जनसामान्यांचे जीव वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, श्रीनिवास पळसुले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हेमंत महाडीक यानी तर आभार विनय पावसकर यांनी मानले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट, वाचनालय आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.