” स्वच्छ विद्यालय पुरस्कार “* *प्राप्त मदर तेरेसा स्कुलचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार

” स्वच्छ विद्यालय पुरस्कार “* *प्राप्त मदर तेरेसा स्कुलचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार

*कोकण Express*

*” स्वच्छ विद्यालय पुरस्कार “* *प्राप्त मदर तेरेसा स्कुलचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार*

स्वच्छतेच्या बाबतीत देशपातळीवरील पुरस्कार मिळविलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या हद्दीतील मदर तेरेसा स्कुलने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या पावलांवर पाऊल ठेवुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमधून *स्वच्छ विद्यालय पुरस्कार* मिळवला याबद्दल भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड अँबेसेडर प्रा.सुनील नांदोसकर यांच्या हस्ते फादर अँन्थोनी डिसोझा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
वेंगुर्ले शहराला स्वच्छतेची परंपरा आहे . येथील नागरिक , मुले , शिक्षक यांना स्वच्छतेची आवड आहे , त्यामुळे वेंगुर्ले शहरातील शाळा व महाविद्यालय हे स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असतात . गेल्या सात वर्षांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छतेचे राज्यस्तरीय व देशपातळीवरील पुरस्कार मिळवून एक स्वच्छतेचा ” वेंगुर्ले पॅटर्न ” बनवला , व त्याची स्फुर्ती घेऊन मदर तेरेसा स्कुलने स्वच्छतेचा पुरस्कार मिळवला या बद्दल नगराध्यक्ष राजन गीरप यांनी अभिनंदन केले .
यावेळी वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसॅडर प्रा.सुनील नांदोसकर यांनी मदर तेरेसा स्कुलचे कौतुक करताना शाळेच्या परीसरासोबत , शाळेतील पाणी , शौचालये ,हात धुण्याची सुविधा , देखभाल दुरुस्ती , कोवीड – १९ ची तयारी इत्यादी बाबतीत सर्व्हेक्षणात गुणांकण मिळवल्याबद्दल शालेय प्रशासनाचे तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले . तसेच
प्लास्टिकमुक्त व प्रदुषनमुक्त वेंगुर्ले शहर बनविण्यासाठी सर्वांनी कटीबद्ध होऊया असे आवाहन केले .
यावेळी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांनी मदर तेरेसा स्कुलने १० वी च्या परीक्षेमध्ये १००% यश मिळवल्याबद्दल अभिनंदन केले .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले , जि. का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर , महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर , रसीका मठकर व आकांक्षा परब , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नांडिस , बुथप्रमुख शेखर काणेकर , भुषण सारंग इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!