*कोकण Express*
*सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा भारत बंदला पाठिंबा…*
*काळ्या फिती लावून व्यवसाय सुरू*
*मालवण ः प्रतिनिधी*
केंद्र शासनाच्या नव्या शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदला सिंधुदुर्गातील व्यापारी महासंघाने पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील व्यापारी काळ्या फिती लावून व्यवसाय करत असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्क आणि त्यांच्या मागण्याबाबत महासंघाला पुर्ण सहानुभुतीही आहे. म्हणूनच व्यापारी बांधवानी काळ्या फिती लावून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करावा, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघातर्फे करण्यात येत आहे.