*कोकण Express*
*शिंदे-भाजप युतीमागे तिसराच शिल्पकार..?*
गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले डोंबिवलीतील भाजप आमदार रवींद्र चव्हाण अखेर दिसले. चव्हाण शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह गुवाहाटीमध्ये असल्याची चर्चा होती(todays political news). इतके दिवस रवींद्र चव्हाणांचं (Ravindra Chavan) कुठेही दर्शन होत नव्हतं. त्यानंतर आज ते मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसले. त्यामुळे शिंदे-भाजप युतीमागे त्यांचा हात असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल.
युतीच्या काळात दोन विधानसभा, तीन लोकसभा आणि महापालिका निवडणुका एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी राज्यमंत्री, भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या जोडीची चर्चा आता पुन्हा रंगू लागली आहे. कारण सोमवारी (दि. २०) रात्रीपासून भाजप आमदार रवींद्र चव्हाण गायब झाले होते (todays political news)आणि आज चक्क पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत एअरपोर्टच्या बाहेर दिसले. तसंच एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांची युती करण्यासाठी भाजप आमदार चव्हाण यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
माजी खासदार आनंद परांजपे, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांच्यावर सर्व प्रचारसभा गर्दीचे नियोजन विश्वासाने सोपवून शिंदे जिल्ह्यातील अन्य उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त असायचे. युतीत असताना आणि आता युती नसताना त्यांनी शिंदेंवर टीका करताना विचारपूर्वक विधाने केली आहेत. तसेच सरसंघचालक मोहन भागवत काही महिन्यांपूर्वी ठाण्यात आले असताना शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात त्यांची आवर्जून भेट घेतली व भागवतांचा सत्कारही केला होता. तसेच भाजप, संघ परिवाराशी त्यांनी नाते घट्ट ठेवले आहे.
आघाडी सरकार असताना शिंदे आणि चव्हाण नेहमीच एकत्र दिसत असत आणि तत्कालीन सत्ताधारी यांच्यावर टीका करत असत. मधल्या काळात युती नव्हती तेव्हा दोघा जणांनी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र राज्यकीय विषय सोडला, तर शिंदे आणि चव्हाण एकत्रच दिसले आहेत.
दुसरीकडे सुरतपासून गुवाहाटी, गोवा आणि आता मुंबईमध्ये शिंदेंसोबत भाजप आमदार रवींद्र चव्हाण होते. मात्र ते कुठेही मीडिया समोर आले नाहीत. चव्हाण सोबत आहेत अशी चर्चा होती, मात्र कुठेही दिसत नव्हते. मतदार संघात सुद्धा ते १० ते १५ दिवस दिसत नव्हते. मात्र आज चक्क पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एअरपोर्टच्या बाहेर येताना दिसले. त्यामुळे शिंदे आणि चव्हाण यांच्या युतीची चर्चा आता पुन्हा रंगू लागली आहे.
भाजप आमदार रवींद्र चव्हाण कॅबिनेट मंत्री होण्याची शक्यता
डोंबिवली भाजप आमदार चव्हाण हे मागच्या टर्मला राज्यमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री होते. तर आता ते कॅबिनेट मंत्री होतील अशी चर्चा आहे आणि शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.