*कोकण Express*
*कणकवली रोटरी क्लब प्रेसिडेंट पदी रोटरी. वर्षा बांदेकर, सेक्रेटरीपदी उमा परब, खजिनदारपदी माधवी मुरकर, उपाध्यक्षपदी स्नेहलता राणे यांची निवड*
*असिस्टंट गव्हर्नरपदी रोटरी. दीपक बेलवलकर यांची निवड*
*1 जुलै रोजी होणार पदग्रहण सोहळा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली : कणकवली सेंट्रल रोटरी क्लबची सन 2022-23 साल साठी नवीन कार्यकरिणी गठीत करण्यात आली असून कणकवली रोटरी क्लबच्या प्रेसिडेंटपदी रोटरी. वर्षा बांदेकर यांची तर सेक्रेटरीपदी उमा परब, खजिनदारपदी माधवी मुरकर, उपाध्यक्षपदी स्नेहलता राणे यांची तर असिस्टंट गव्हर्नर पदी रोटरी. दीपक बेलवलकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती मावळते प्रेसिडेंट रोटरी. डॉ. विद्याधर तायशेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. साई पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना विद्यमान प्रेसिडेंट डॉ. विद्याधर तायशेटे यांनी नवीन कार्यकरिणी जाहीर केली. यावेळी नूतन प्रेसिडेंट वर्षा बांदेकर, उमा परब, माधवी मुरकर, तृप्ती कांबळे, रोटरी.दीपक बेलवलकर, दादा कुडतरकर,नितीन बांदेकर,वीरेंद्र नाणचे आदी उपस्थित होते. 1जुलै रोजी कणकवली शहरातील भगवती मंगल कार्यालयात सायंकाळी 6 वाजता डिजिई नासीर बोरसादवाला यांच्या तसेच नगराध्यक्ष समीर नलावडें यांच्या प्रमुख उपस्थितीत पद्ग्रहण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती विद्यमान प्रेसिडेंट डॉ. तायशेटे यांनी दिली. पद्ग्रहण सोहळ्यानिमित्त कणकवली न.पं च्या कर्मचाऱ्याचा उत्कृष्ट कर्मचारी व कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील पोस्ट मार्टेम विभागातील कटर पदी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.तसेच 1 जुलै हा डॉक्टर्स डे असून त्यानिमित्त कणकवली रोटरी क्लबमधील सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पद्ग्रहण सोहळ्याचे औचित्य साधून सायंकाळी 4 वाजता कणकवली शहर मर्यादित पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.मुगा पासून घरी बनविलेले पौष्टिक पदार्थ आकर्षक सजावटीसह स्पर्धकांनी भगवती मंगल कार्यालयात आणायचे आहेत. विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच आगामी वर्षभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती नूतन प्रेसिडेंट वर्षा बांदेकर यांनी दिली. आगामी वर्षात नूतन कार्यकरिणीच्या माध्यमातून महिला सबलीकरण, सक्षमीकरण वर जास्त भर दिला जाणार असल्याचे रोटरी. दादा कुडतरकर म्हणाले.