तळेरे येथे ३० जुन ला रक्तदान शिबीराचे आयोजन

तळेरे येथे ३० जुन ला रक्तदान शिबीराचे आयोजन

*कोकण Express*

*तळेरे येथे ३० जुन ला रक्तदान शिबीराचे आयोजन*

*कासार्डे:संजय भोसले*

तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर यांच्या २५ व्या स्मृती वर्षानिमित्त 30 जूनला सकाळी 9.30 वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात हे शिबिर होणार आहे.

तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट, स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने रक्तदान शिबिरासह सामाजिक, क्रिडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, आरोग्य अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबविले जातात. या रक्तदान शिबिरास इच्छुक रक्तदात्यांनी उपस्थित राहून श्रेष्ठ असे रक्तदान करावे, असे आवाहन स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट, वाचनालय आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!