*कोकण Express*
*मोठी दुर्घटना! मुंबईतील कुर्ल्यात 4 मजली इमारत कोसळली*
ढिगाऱ्यातून 14 जणांना बाहेर काढण्यात यश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखालून 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. मात्र अजूनही 20-25 लोक खाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे मदतकार्यात मदतीसाठी एनडीआरएफलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलंय.
अपघातानंतर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांन घटनास्थळी भेट दिलीये. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मजली इमारत जीर्ण झाली होली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. असं असतानाही ते या ठिकाणी राहत होते.