हरकतींची सुनावणी होऊन मतदारसंघ निश्चित

हरकतींची सुनावणी होऊन मतदारसंघ निश्चित

*कोकण Express*

*हरकतींची सुनावणी होऊन मतदारसंघ निश्चित*

*सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितींच्या आरक्षणाकडे आता लक्ष*

*सिंधुनगरी ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५५ आणि पंचायत समितीच्या ११० जागांसाठी आयुक्त यानी मंजूर केलेल्या पाच हरकती मधील ओटव ऐवजी सावडाव पंचायत समिती मतदार संघाचा तसेच मालवण तालुक्यातील दोन मतदार संघातील गोळवण आणि आडवली मसदे या दोन वाड्यांचा समावेश करून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही आरक्षण प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे त्यामुळे कोणता मतदार संघ खुला प्रवर्ग ,महिला, आणि मागासवर्गीय आरक्षित होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समित्या प्रारुप प्रभाग रचनेत ४० हरकतीआलया होत्या त्या पैकी ४ हरकती मंजुर केल्या असून ३६ हरकती फेटाळण्यात आल्या होत्या यात कणकवली तालुक्यातील ओटव पंचायत समिती ऐवजी सावडाव पंचायत समिती गण तर मालवण तालुक्यातील आडवली मालडी जि .प.मतदार संघातील गवळीवाडी जोडावी. व गोळवण जि प मतदार संघातील नागझरवाडी जोडावी या हरकती मान्य केल्या आहेत या प्रारूप रचनेची अंतिम प्रभाग रचना आज २७ जून रोजी प्रसिद्ध केली आहे.

जिल्हा परिषदेच्या ५० वरून ५५ आणि पंचायत समिती १००वरून ११० प.सं मतदारसंघ निश्चित झाले आहेत प्रारुप प्रभाग रचनेमध्ये बदलाच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या यात ४० हरकती होत्या या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत या हरकते मध्ये सावंतवाडी, दोडामार्ग ,वैभववाडी तालुक्यात एकही हरकत प्राप्त झाली नव्हती कणकवली तालुक्यातील नांदगाव जि. प .मतदार संघातील पंचायत समिती मतदारसंघ नव्याने प्रभाग रचना केली होती त्यात बदल करून ओटव पंचायत समिती मतदार संघ करण्यात यावा नव्याने प्रभाग रचना केली होती त्यात बदल करून ठेवायची सावडाव पंचायत समिती मतदार संघ करण्यात यावा हे कोकण आयुक्तांनी मान्य केले तसेच मालवण तालुक्यातील गोळवण प.स मतदारसंघातील नागझरवाडी जोडण्याचा दोन हरकती होत्या त्या दोन्ही हरकती मान्य केले आहेत तसेच या तालुक्यातील आडवली मांलडी जि प मतदार संघात गवळी वाडी जोडावी ही अट मान्य केली आहे चाळीस हरकती पैकीच्या हरकती मान्य केले असून३६ हरकती फेटाळण्यात आले आहेत तसा अहवाल जिल्हाधिकारी प्रशासनाकडे पाठविण्यात आले होते .निवडणूक आयोगाच्याी प. स मतदार संघ प्रारूप रचना कार्यक्रमानुसार मतदार संघ जि प गट गं प्रभाग रचना प्रस्ताव सादर केला होता आयुक्त यानी ३० मे रोजी भौगोलिक व लोकसंख्येच्या आधारेभौगोलिक व लोकसंख्येच्या आधारे रचना मान्यता दिली होती. २ जून रोजी प्रारुप प्रभाग गटांची संख्या जि प ५५व प.स. ११० निश्चित केली होती २७जुन रोजी गट प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. व त्यानुसार आरक्षणव सोडत काढण्यात येणार आहे आता २७ जून नंतर कोणता मतदार संघ महिला व खुल्या मागासवर्गीय मतदारसंघासाठी आरक्षित होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!