*कोकण Express*
*भटके विमुक्त आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी बाळा गोसावी यांची निवड…*
*मालवण ः प्रतिनिधी*
तालुका भटके-विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच कै. नारायण शांताराम गोसावी चँरिटेबल ट्रस्ट मसुरेचे अध्यक्ष शांताराम ऊर्फ बाळासाहेब गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.
भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली, माजी खासदार निलेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवड करण्यात आली.
कुडाळ येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे शांताराम (बाळा) गोसावी यांना जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व सत्कार करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत व समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करु असे श्री. गोसावी यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रामध्ये बाळा गोसावी यांचे मोठे योगदान आहे.
यावेळी मालवण शक्तीकेंद्र प्रमुख निलम पांजरी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश झोरे, शशिकांत इंगळे, भटके विमुक्त हक्क परिषद जिल्हाध्यक्ष, राजु इंगळे समाजसेवक, सुरेश झोरे, दिपक खरात, विनोद मुणगेकर, राजाराम पाटील, हर्ष गावकर, रामचंद्र मसुरकर,
शैलेश मयेकर आदी उपस्थित होते. गोसावी यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.