कणकवलीत भाजपा-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा

कणकवलीत भाजपा-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा

*कोकण Express*

*कणकवलीत भाजपा-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राज्यभरात आंदोलन, मोर्चे व निषेध आदी आंदोलने सुरु असताना कणकवली तालुक्यातील शिवसेना व भाजपाच्या प्रत्येकी १० अशा एकूण २० पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटिसा काढण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर या नोटिसामध्ये तसा उल्लेख करत कणकवली पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांनी या नोटिस काढल्या आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता या नोटिसा देण्यात आल्याची माहिती हुलावले यांनी दिली. दरम्यान काल कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेसमोर फटाके फोडत पालकमंत्री उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाल्याबद्दल जल्लोष केला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने खबरदारीच्या उपाययोजना घेत नोटिसा बजावण्याची कार्यवाही हाती घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!