*कोकण Express*
*सांगवे येथील रेशन दुकानात धान्याचा काळाबाजार…!*
*शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धान्य भरलेला टेम्पो पकडला…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील सांगवे येथील रेशन दुकानावरून धान्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी एक धान्य भरलेला टेम्पो पकडला.
दरम्यान, देवगड येथील बोलेरो टेम्पोमधून या धान्याचा काळाबाजार करण्यासाठी वाहतूक होत असल्याचा आरोप शिवसेनेचे कार्यकर्ते बेनी डिसोझा यांनी केला.
“सांगवे सोसायटी”चे धान्य टेम्पोतून भरून देवगड येथे वाहतूक केले जात होते, गेले अनेक दिवस येथे धान्याचा काळा बाजार सुरू असून यासाठी आम्ही रात्रं – दिवस या धान्याच्या काळ्या बाजारावर लक्ष ठेवून होतो. या धान्याच्या काळ्या बाजारामध्ये गौरव सावंत, सोसायटीचे चेअरमन आणि त्यांची टीम सामील असल्याचा आरोप डिसोझा यांनी केला! या प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाईची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत व इतर उपस्थित होते.